तर्कशुद्ध विचार व निर्णय - Logical Thinking | Akp51v मराठी

प्रत्येक घटनेमागे एकाहून अधिक कारणे असतात; त्यामुळे थोड्याशा माहितीच्या आधारावर फार मोठे तथा अत्यंत गंभीर असे निष्कर्ष काढणे, म्हणजे खूपच घाई केल्यासारखे होते. मग फक्त व फक्त प्रचंड माहिती मिळवायच्या मागे खूप सगळे श्रम गुंतवावेत का?

नाही, वेळ ही एकमेव अशी संपत्ती असते जी फक्त खर्च होऊ शकते.

Logical thinking in Marathi - article image
ब्लॉग इमेज: लॉजिक वापरून निर्णय घ्या.

अतिमहितीमुळे आपल्याला काम पूर्ण होत असल्याचा भास होतो; एकावर एक अहवाल जमा केले, की जणू वास्तव जीवनातील अनेक प्रश्न आपोआप सुटले, अशी वृत्ती प्रबळ बनू लागते. एकदा का ही धारणा मनात घर करून बसली, की मग औपचारिकता वाढत जाते.

मुख्य मुद्दा राहतो बाजूलाच, पण आखलेले रकाने आणि वाक्यरचना या गोष्टींना आवश्यकतेहून जास्त महत्व द्यायला सुरुवात होते.

तेव्हा जपावे आपल्या मनाला व ठेवावे भान या अटळ कालप्रवाहाचे!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्याची आठवण, एका बसप्रवासाची | Akp51v मराठी

मराठीतून मजकूरनिर्मिती करण्याची आवश्यकता | Akp51v मराठी