पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्याची आठवण, एका बसप्रवासाची | Akp51v मराठी

इमेज
सकाळी पाच वाजता उठायचो मी. सात वाजेपर्यंत सकाळी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करून, आईआजीने दिलेला डबा बॅगेत भरून, मी धाव मारायचो. पण ती सातची बस कधीकधी पार साडेआठला उगवायची. धन्यबा इट्ठला. किती तो संयम शिकलो मी, बसच्या कृपेने. बॅग होती सात किलो वजनाची. नाही. कधीकधी हे वजन नऊ किलोचं असायचं. दीर्घकाळ वजन बॅग पाठीवर घेऊन उभे राहिले असता, आपल्या मणक्यावर ताण पडत असतो. त्यामुळे मी बॅगेला त्या बाकावर ठेवायचो. ब्लॉग इमेज: Bus travel memories. सात वाजता व सव्वाआठ वाजता. अश्या दोन गाड्या असायच्या सकाळच्या वेळी. आधी सांगितल्याप्रमाणे जर का सातच्या गाडीला उशीर झाला, तर सव्वाआठची बस पकडायचो. परंतु सातच्या बसला गर्दी कमी असायची. आणि शक्यतो सगळेच आत्मे झोपून घ्यायचे. कारण त्यांना रेल्वेपर्यंत पोहोचायला एक तास लागायचा. रेल्वेस्थानकानंतर माझा टप्पा यायचा. त्यामुळे काहीच समस्या नसायची. आणि सव्वाआठच्या बसला सर्व वयोगटातील, विद्यार्थी विद्यार्थिनी पण गर्दीचा भाग बनत. मला पार करावयच्या पन्नासेक छोट्यामोठ्या थांब्यांपैकी अर्धे थांबे तर शाळांजवळचे असायचे. एकदा का या 'लहान देह महान गोंगाट' टोळ्यांनी क

तर्कशुद्ध विचार व निर्णय - Logical Thinking | Akp51v मराठी

इमेज
प्रत्येक घटनेमागे एकाहून अधिक कारणे असतात; त्यामुळे थोड्याशा माहितीच्या आधारावर फार मोठे तथा अत्यंत गंभीर असे निष्कर्ष काढणे, म्हणजे खूपच घाई केल्यासारखे होते. मग फक्त व फक्त प्रचंड माहिती मिळवायच्या मागे खूप सगळे श्रम गुंतवावेत का? नाही, वेळ ही एकमेव अशी संपत्ती असते जी फक्त खर्च होऊ शकते. ब्लॉग इमेज: लॉजिक वापरून निर्णय घ्या. अतिमहितीमुळे आपल्याला काम पूर्ण होत असल्याचा भास होतो; एकावर एक अहवाल जमा केले, की जणू वास्तव जीवनातील अनेक प्रश्न आपोआप सुटले, अशी वृत्ती प्रबळ बनू लागते. एकदा का ही धारणा मनात घर करून बसली, की मग औपचारिकता वाढत जाते. मुख्य मुद्दा राहतो बाजूलाच, पण आखलेले रकाने आणि वाक्यरचना या गोष्टींना आवश्यकतेहून जास्त महत्व द्यायला सुरुवात होते. तेव्हा जपावे आपल्या मनाला व ठेवावे भान या अटळ कालप्रवाहाचे!