पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठीतून मजकूरनिर्मिती करण्याची आवश्यकता | Akp51v मराठी

इमेज
आंतरजाल (इंटरनेट) प्रचंड ज्ञानाने समृद्ध आहे. हे सारे ज्ञान कधी ध्वनीच्या रूपाने, तर कधी हलत्या चलतचित्रांतून (मोशन ग्राफिक्स) आपल्याला जाणून घेणे सहजशक्य असते. परंतु इंटरनेटचे जन्मस्थान पश्चिमेकडील राष्ट्रांत आहे. याचा परिणाम म्हणजे सारे 'ऑनलाइन' असलेले माहितीस्रोत मुख्यतः इंग्रजीतून असल्याचे आपणांस आढळते. तरीदेखील यासाठी पाश्चात्य देशांतील युवक-युवती तसेच अन्य अबालवृद्ध इत्यादि व्यक्तींचे योगदान कारणीभूत ठरते. ब्लॉग इमेज: Create Marathi content. इंग्रजीतून उपलब्ध असलेले वैश्विक ज्ञान जाणून घेण्यासाठी इंग्रजी शिकण्याचा प्रयास करणे, तथा त्यादृष्टीने इंग्रजी माध्यमातून पुढील पिढीस शिकवू पाहणे, यात तांत्रिकदृष्ट्या काहीच गैर किंवा अनैसर्गिक नसले; तरी काही गोष्टींचा आपण विसर पडू देता कामा नये. इंग्रजी ही पण एक भाषा आहे, आणि जर आधीच्या पुर्वजांनी चारहून अधिक भाषा अवगत केल्या असतील, ज्यांचा आकडा कधीकधी १० च्या पण पुढे जायचा, तर मग विविध भाषा शिकणे आपलेसुद्धा नैतिक कर्तव्यच ठरते. आणि सारे तत्त्वज्ञान दोन क्षण बाजूला ठेवले, तरीदेखील आपण आपल्या मातृभाषेत मजकूर व साहित्यनिर्मिती का