पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्याची आठवण, एका बसप्रवासाची | Akp51v मराठी

इमेज
सकाळी पाच वाजता उठायचो मी. सात वाजेपर्यंत सकाळी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करून, आईआजीने दिलेला डबा बॅगेत भरून, मी धाव मारायचो. पण ती सातची बस कधीकधी पार साडेआठला उगवायची. धन्यबा इट्ठला. किती तो संयम शिकलो मी, बसच्या कृपेने. बॅग होती सात किलो वजनाची. नाही. कधीकधी हे वजन नऊ किलोचं असायचं. दीर्घकाळ वजन बॅग पाठीवर घेऊन उभे राहिले असता, आपल्या मणक्यावर ताण पडत असतो. त्यामुळे मी बॅगेला त्या बाकावर ठेवायचो. ब्लॉग इमेज: Bus travel memories. सात वाजता व सव्वाआठ वाजता. अश्या दोन गाड्या असायच्या सकाळच्या वेळी. आधी सांगितल्याप्रमाणे जर का सातच्या गाडीला उशीर झाला, तर सव्वाआठची बस पकडायचो. परंतु सातच्या बसला गर्दी कमी असायची. आणि शक्यतो सगळेच आत्मे झोपून घ्यायचे. कारण त्यांना रेल्वेपर्यंत पोहोचायला एक तास लागायचा. रेल्वेस्थानकानंतर माझा टप्पा यायचा. त्यामुळे काहीच समस्या नसायची. आणि सव्वाआठच्या बसला सर्व वयोगटातील, विद्यार्थी विद्यार्थिनी पण गर्दीचा भाग बनत. मला पार करावयच्या पन्नासेक छोट्यामोठ्या थांब्यांपैकी अर्धे थांबे तर शाळांजवळचे असायचे. एकदा का या 'लहान देह महान गोंगाट' टोळ्यांनी क...